प्रेमीयुगुलाने प्राशन केले विष

0

मुलीचा मृत्यू, प्रियकर अत्यवस्थ : नायगाव घुग्घुसम येथील घटनेने खळबळ

चंद्रपूर. प्रेमीयुगुलाने आपआपल्या घरी एकाचवेळी उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले (lovers drank poison). प्रेयसीचा मृत्यू झाला तर प्रियकर खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून त्याची प्रकृती चिंताजनक (Girl Death, Lover In Danger ) असल्याचे सांगण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district ) वर्धा नदीच्या काठावर असलेल्या नायगाव घुग्घुस (Naigaon Ghugghus ) येथे ही घटना घडली, या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडवून दिली आहे. ग्रामस्थांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. घरच्यांचा प्रेमसंबंधांना विरोध असल्याने, लग्नाची परवानगी मिळणार नाही, या शक्यतेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. तर काहींच्या मते कर्जबाजारीपणातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही काहींचे म्हणणे आहे. तुर्त पोलिसांकडून प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिस तपासातूनच अनेक बाबी स्पष्ट होऊ शकणार आहे.
शुभांगी भोंगळे (२४) असे मृताचे तर राकेश जेणेकर (२७) असे अत्यवस्थ प्रियकराचे नाव आहे. दोघेही नायगाव घुग्घूस येथील रहिवासी आहेत. शुभांगी रामनगर तर राकेश गांधीनगरात राहतो. दीर्घ काळापासून यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांनी सोबत जगण्या मरण्याच्या शपथाही घेतल्या होत्या. पण, घरून परवानगी मिळण्याची शक्यताच नसल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

व्हीडिओ कॉलकरून घेतले वीष

पुढे आलेल्या माहितीनुसार, दोघांनीही आत्महत्येचा निर्णय अधिच घेतला होता. ठरल्याप्रमाणे दोघांनी दुपारी व्हीडिओ कॉलवरून संभाषण सुरू केले. सोबतच विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती ढासळू लागल्याने कुटुंबीयांना शंका आली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे शुभांगीचा मृत्यू झाला तर राकेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना जबर धक्का बसला आहे. आत्महत्येमागील कारण अजूनही अस्पष्ट असल्याने प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी सांगितले. दरम्यान मुलावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्यातून दोघांमध्ये वाद झाला होता अशीही माहिती समोर येत आहे.

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा