महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा उद्या फैसला

0

 

नवी दिल्ली (New Dillhi) : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. स्वतः (Chief Justice Dhananjay Chandrachud)सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी तसे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यापैकी एक प्रकरण 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचे आहे. मात्र, याबाबत सायंकाळीच स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
गेल्या आहे. महाराष्ट्राची जनता आणि सर्वच राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या निकालामुळे प्रामुख्याने शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे खासगार राहुल शेवाळे हे दिल्लीला तातडीने रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

या 16 आमदारांवर टांगती तलवार

अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या 16 आमदारांमध्ये (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह (Sandipan Bhumre) संदीपान भुमरे,
(Abdul Sattar )अब्दुल सत्तार, (Tanaji Sawant )तानाजी सावंत
(Sanjay Shirsat)संजय शिरसाट,  (Yamini Jadhav)यामिनी जाधव, (Chimanrao Patil)चिमणराव पाटील,
(Bharat Gogavale)भरत गोगावले,  (Lata Sonavane)लता सोनावणे
(Ramesh Bornare)रमेश बोरणारे, (Prakash Surve)प्रकाश सुर्वे,
( Balaji Kinikar )बालाजी किणीकर, (Mahesh Shinde)महेश शिंदे
(Anil Babar)अनिल बाबर, (Sanjay Raymulkar)संजय रायमुलकर, (Balaji Kalyankar)बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय या आमदारांना अपात्र ठरविते की त्याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.