अयोध्येत श्रीराम मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा

0

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केला अभिषेक विधी

अयोध्या, 22 जानेवारी   : तब्बल साडेपाचशे वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि प्रतीक्षेनंतर आज, सोमवारी अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वैदिक मंत्रोच्चारात विधीपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजीत मुहूर्तावर श्रीराम मूर्तींला अभिषेक करत प्राणप्रतिष्ठा केली. यासाठी पंतप्रधान गेल्या 7 दिवसांपासून धार्मिक संकल्प आणि अनुष्ठानरत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, Dr. Mohan Bhagwat  उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  Governor Anandiben Patel and Chief Minister Yogi Adityanath हेही उपस्थित होते.

प्राणप्रतिष्ठा पूजाविधीचे प्रमुख यजमान म्हणून पंतप्रधानांनी दुपारी 12 वाजून 7 मिनीटांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. श्री राम लल्लाला पांघरण्यासाठी त्यांनी हातात चांदीची छत्री घेतली होती. पूजेपूर्वी पंतप्रधानांनी गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्याची शपथ घेतली. यानंतर शंखांच्या गजरात पंतप्रधानांच्या हस्ते श्री रामलल्ला यांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. काशीचे प्रसिद्ध वैदिक आचार्य गणेशवर शास्त्री द्रविड आणि आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनात 121 वैदिक आचार्यांनी हे अनुष्ठान पूर्ण केले.