नाशिक, २२ जानेवारी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आसाम येथील भारत जोडून न्याय यात्रेतील आसाम मधील भाजप सरकारच्या गुंडांनी हल्ला करून वाहनांची तोडफोड केली, या हल्ल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निषेध करीत असल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना महा अधिवेशनाच्या निमित्ताने हॉटेल यशस्वी आहे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Sanjay Raut press conference Nasik
काँग्रेसचे राहुल गांधी, वेणू गोपाल यांच्याशी आज सकाळी आपले बोलणे झाले असून असाम येथे भारत जोडून नाही यात्रेच्या दरम्यान झालेल्या घटनेचा वृत्तांत समजून घेतला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला व वाहनांची तोडफोड प्रकाराचा शिवसेनेने निषेध केला असून तेथील भाजप सरकारने हा हल्ला केला आहे, सरकारी गुंडाचे हे काम असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
हा प्रकार म्हणजे लोकशाही विरुद्ध हुकूम ठाई असा असून काँग्रेसची संविधान बचाव भाजपा हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत असून देशाचे लोकतंत्र धोक्यात आले असल्याने लोकतंत्र बचत वाचवण्यासाठीच शिवसेनेचे महाअधिवेशन नाशकात होत आहे, देशातील वातावरण बदलण्याचे सर्वात नाशिकमधून होत असल्याचे ते म्हणाले.
अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळाबद्दल विचारले असता खा. राऊत म्हणाले, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा अभूतपूर्व असा आहे, मात्र भाजपने त्याला इव्हेंटचे स्वरूप दिले आहे, सोहळ्याचे नियोजनही उत्तम असून इव्हेंटच्या आयोजनाबाबत भाजपचा संपूर्ण जगात कोणी हात धरू शकणार नाही, मात्र त्याद्वारे भाजपाने निवडणूकीचा प्रचार सुरू केला आहे. धार्मिक सोहळा त्यांनी खाजगी सोहळा केला असून आम्ही सांगू तेच आणि आम्ही सांगू तसेच होईल असे एकंदरीत नियोजन आहे. त्यामुळे आम्ही आयोध्या येथे न जाता प्रभू राम आणि संघर्ष जेथे केला त्या नाशिकच्या तपोभूमीत आम्ही महा अधिवेशनाच्या निमित्ताने प्रभू श्री काळाराम मंदिरात महाआरती गंगा गोदावरीचे पूजन तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करीत केवळ राज्याचेच नाही तर देशातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे आमच्यामुळेच अयोध्येत प्रथम आले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ सजिंडे यांना आम्हीच प्रथम अयोध्येत नेले होते, त्यावेळी सहभागी उतरावर महाआरती व पूजन करण्यात आले होते, नाशिक शिवसेनेलाच यजमानपद दिले होते. आता शिंदे हे भाजपवाले झाले असल्यामुळे त्यांना पक्षाचा आदेश पाळावा लागत असेल शिंदे यांचा शिवसेनेची काहीही संबंध नसल्याने हे भाजपाच्या इव्हेंटला गेलेआहे, असेही राऊत त्यांनी सांगितले.
रामाच्या भूमीत शिवसेनेचे वाघ
अयोध्येतील मशिद पाडण्यात व राम मंदिर उभारणीत शिवसेनाचा मोठा सहभाग असून हे दाखविण्यासाठी सुभाष देसाई यांच्या प्रयत्नातून ”रामभूमीत शिवसेनेचे वाघ” हे प्रदर्शन भरविण्यास आले असून त्यामध्ये शिवसेनेच्या कारसेवकांचे अनुभव व छायाचित्रे पहावयास मिळणार आहे. नासिक नंतर हे चित्र प्रदर्शन संपूर्ण राज्यभर ठिकाणी भरवण्यात येणार असल्याचे खासदारांनी सांगितले.
रामभक्त फडणवीस यांनीच उद्घाटनाला यावे
देवेंद्र फडणवीस यांच्या स्मरणशक्तीला धक्का देण्यासाठी हे प्रदर्शन नागपूरला देखील भरविण्यात येणार असून ते खरे राम भक्त असतील तर उद्घाटना उद्घाटन त्यांनीच करावे असे आमंत्रण देत असल्याचे खासदार म्हणाले. भजन दिला जाताना नागपूर येथील रेल्वे स्टेशनवरील फडणवीस यांनी टाकलेला फोटो फडणवीस सदृश्य व्यक्ती असून त्यांनी केलेले विधान रामभक्तांचे अपमान करणारे असल्याचे खासदार राऊत म्हणाले.
नाशिकचे हे अधिवेशन दिशादर्शक ठरणारे
शिवसेनेचे ३० वर्षांनी नाशिक शहरात पुन्हा एकदा महाअधिवेशन भरत असून राज्यातील गेल्या दीड वर्षातील घडामोडी तसेच २०१३ नंतर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पक्ष पुढे नेला, मात्र भाजपाने सत्ता पैशाचा दबाव टाकून तोडला. आमच्याकडे पक्षाचे नावही नाही आणि चिन्हही नाही, मात्र शिवसेना पक्ष बदललेला नाही. आमचे घर शाबूत आहे, छप्पर शाबूत आहे, जमीन पण शाबूत आहे आणि मुख्य म्हणजे घरातील माणसेही शाबुत आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसून केवळ आमच्या पक्षाची नेमप्लेट काही भामट्यानी पळवून नेली असेही ते म्हणाले.