मुंबई : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आगामी काही महिन्यांत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा दिलाय. हा निर्णय भाजपसाठी गेमचेंजर ठरु शकतो, अशी चर्चा सुरु आहे. लाखो झोपडपट्टीधारकांना अडीच लाखांत घर मिळणार आहे. जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी हा निर्णय जाहीर केला असून त्यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. योजनेतील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.