
अमरावती AMRAVATI – अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून MARATHA ARAKSHAN मराठा आरक्षणासाठी यंत्रणा कामाला लागली असून, सर्व्हेचे काम सुरू झालेले आहे. या सर्वात प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांसोबतचं 366 खाजगी शाळांमधील शिक्षकांना सर्व्हेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. सकाळी दहा वाजता हे कर्मचारी सर्व्हेसाठी निघतात, पाच वाजेपर्यंत सर्व्हे करतात. मात्र, दुपारच्या वेळी पुरुष मंडळी घरी नसल्याने महिला बऱ्याचदा सर्व्हे करणाऱ्या मंडळींना माहिती देण्यास टाळाटाळ करतात. तर काही ठिकाणी अक्षरशः दरवाजाच उघडत नसल्याचंसर्व्हे कर्त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी मराठा किंवा ओपन असेल त्या घरी 181 प्रश्न विचारायला किमान एक तास तरी लागतो, असे सर्वे कर्त्यांचे मत आहे. परंतु जिल्ह्यात 70 टक्के काम पूर्ण झालेल आहे. या सर्व्हे मधून ओपन व मराठा समाजाची उत्तम व बारीकसारीक माहिती मिळत असल्याने सरकारला यातून निश्चितच चांगली माहिती मिळेल व मराठा आरक्षणासंदर्भात धोरण ठरवता येईल, असे सांगण्यात आले.