चोरीचा छडा, ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0

 

अमरावती- अमरावती येथील राठी नगरमध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. 5 आरोपींना अटक करून देशी कट्टा व चाकू जप्त करण्यात आला. जनगणना आणि मराठा आरक्षण सर्व्हेच्या नावाखाली नायब तहसीलदाराच्या घरात घुसून लूट केली होती. नायब तहसिलदाराच्या पत्नीचे हातपाय बांधून बंदुकीच्या धाकावर 5 लाखांचे दागिने पळवले. घटनेतील मुख्य आरोपी नायब तहसिलदाराच्या घरीच चालक म्हणून काम करत होता.
पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून चोरी केलेले 5 लाख 30 हजार रुपयांचे ऐवज जप्त करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला.सर्वेक्षणाच्या नावाखाली भरदिवसा चोरी झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये दोन आरोपी घटनेच्या दिवशी कैद झाले होते. त्याच अनुषंगाने 8 पोलीस पथक तैनात करण्यात आले. 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यावर पोलिसांनी आरोपींला अटक केली.