अमरावती- शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी अमरावतीत 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.
बच्चू कडू स्वतः सत्तेत सहभागी असताना सुद्धा आपल्याच सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत असल्याने चर्चेत आहेत. सत्तेत असून मोर्चा काढू नये अशी कुठे घटनेत आणि कायद्यात तरतूद नाही. आम्ही जेव्हा पाठींबा दिला तेव्हा पाठिंबा घेणाऱ्यानेही म्हटले नाही की सत्तेत असून मोर्चा काढू नये, असे काही बंधन नसते. ही चळवळ आहे ही चळवळ आम्ही राज्यभर चालवणार
शेत मजुरांसाठी योजना नाही, प्रकल्प ग्रस्त शेतकरी, कंत्राटी कामगार, पेरणी ते कंपनी पर्यंतचे काम MREGS मधून व्हावे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. असे खूप प्रश्न आहेत. बच्चू कडूच्या केवळ एकाच्या आवाजाने काही होणार नाही याला जनतेचा आवाज सुद्धा लागेल. अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.