काल शरद पवारांसोबत होतो आणि आजही आहे – जयंत पाटील

0

 

मुंबई : प्रदेश कार्यालयात मुंबईतील जिल्हाध्यक्ष यांची आज बैठक बोलवली आहे . राज्यात ज्या काही निवडणूक झाल्या त्याचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे त्याचा आणि तुमच्या बातम्यांचा काही सम्बन्ध नाही . मी कुठेही गेलो नाही कालही मी शरद पवार यांच्याकडे होतो, आजही आहे असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांनी आज स्पष्ट करीत अफवाना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
आ जयंत पाटील म्हणाले,खरेतर मला संशय तुमच्या चॅनलवर येतो. म्हणजे तुमच्यावरच संशय येणार. खऱ्या बातम्या दिल्या तर विश्वासहर्ता सगळ्यांचीच वाढेल.विधान सभेचे काही सदस्य होते ते मध्यरात्री गेले.
सकाळी मी पुन्हा शरद पवारांकडे बैठकीला गेलो .महाविकास आघाडीच्या बैठकीला होतो. मुळातअशा बातम्या कोणी पेरल्या याचा शोध माझ्यावतीने तुम्ही करावा,
काल त्यांचा वाढदिवस होता ते जर कुटुंबासोबत वाढदिवस घालवत असेल तर त्यांनी 24 तास रिचेबल रहावं असं मला वाटत नाही. एवढ्या वर्षात आम्ही एकत्र काम करतच होतो त्यामुळे आता वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.