राजकीय वर्तुळात खळबळ आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा

0

चिमूर: चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर (Chimur in Chandrapur district) विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडीया (MLA Kirtikumar Bhangdiya) यांच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल (case of molestation has been registered ) करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या भाऊ व त्यांच्या पत्नीला त्यांच्या घरात शिरून मारहाण केल्याचा आरोपी त्यांच्यावर आहे. प्रथम पतीला मारहाण करण्यात आली. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या त्याच्या पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली. यात तिच्या अंगावरील कपडे देखील फाटल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध चिमूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर विधानसभा संघाचे आमदार बंटी भांगडिया हे ११ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता चिमूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसले. त्यावेळी त्यांच्यासोबत १० ते १५ कार्यकर्ते होते. या सर्वांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीतेच्या तक्रारीनुसार, ती पती साईनाथ बुटकेसह चिमूरमध्ये राहते. साईनाथ यांचा मोठा भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस आहेत. शनिवारी भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन घराबाहेर आले. बुटके यांना शिवीगाळ केली. बळजबरीने घराच्या आत शिरले. साईनाथ यांना मारहाण केली. मारहाण करतच त्यांना घराबाहेर ओढून आणले. या मारहाणीला विरोध करताना, त्यांचा विनयभंग केला गेला, असा आरोप पीडितेने केला आहे. यासोबतच, आमदार भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिला, साईनाथ आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांना देखील मारहाण केल्याचे पीडीतेचे म्हणणे आहे. काँग्रेसचे पदाधिकारी असलेले गजानन बुटके घटनास्थळी दाखल झाले असता, गजानन यांना ही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना देखील भांगडीया यांनी मारहाण केली, असेही दाखल केलेत्या तक्रारीत म्हंटले आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.