
ग्राहकांनी वस्तू व सेवा विकत घेतांना घ्यावयाची काळजी….
1. ग्राहकांनी प्रत्येक वस्तू खरेदी करतांना पक्के बील घेणे आवश्यक आहे.
2. विशेषत औषधी व खाद्यपदार्थ खरेदी करताना पक्के बील घेणे आवश्यक आहे.
3. बाजारात वस्तू विकत घेतांना वजनकाटा बरोबर आहे किंवा नाही हे तपासले पाहिजे.
4. प्रत्येक आवेष्टीत (पॅकिंग) वस्तू विकत घेतांना विशेषतः खाद्यपदार्थ, दुध आणि अन्य वस्तूंच्या पॅकेटवर एक्सपायरी तारीख हे पाहूनच खरेदी करावी.
5. सोन्याचे दागिने खरेदी करताना हाॅलमार्क असलेले दागिने खरेदी करावे. व सोने किती कॅरेट चे आहे हे तपासून घ्यावे.
6. मिठाई व खाद्यपदार्थ खरेदी करतेवेळी त्याचे वजन खरड्याच्या डब्यासहीत केले जात नाही ना याची खात्री करून घ्यावी. मिठाईच्या किंमतीत खरड्याचा डबा विकल्या जातो याकडे लक्ष द्यावे.लक्ष न दिल्यास ५० ते ६० ग्रॅम वजनाची मिठाई कमी मिळेल.
7. खाद्यतेल किंवा इतर वस्तु खरेदी करतांना वजन बरोबर बघावे.
8. कोल्ड्रिंक्स (थंड पेय) खरेदी करताना कुलींगचे (थंड करण्याचे) वेगळे पैसे देवू नये.जर वेगळे पैसे घेत असल्यास वजनमाप विभागाकडे तक्रार करावी.
9. कुठल्याही वस्तू खरेदी करताना छापील किंमतीच्या (MRP) वर पैसे घेत असेल तर वजनमाप विभागाकडे तक्रार करावी.
10. सेल, डिस्काउंट या भ्रामक जाहीरातीपासून सावध राहावे.
11. पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदी करताना मिटर बघूनच खरेदी करावी.
12. शेतीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करताना खरे असल्याची खात्री करून घ्यावी.
13. खाद्यपदार्थातील भेसळीबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे तक्रार करावी.
14. गॅस सिलेंडर घरपोच आल्यावर त्याचे वजन करून मागावे.गॅसचे निव्वळ वजन हे १४.२ कि.ग्रॅम असते. व रिकाम्या सिलेंडरचे वजन १५ किंवा १६ किलो असते.(सिलेंडर वर लिहीलेले असते) भरलेल्या सिलेंडर चे एकूण वजन हे २९ ते ३० किलो असते. हे बघून घ्यावे नसल्यास कंपनी कडे तक्रार करावी.
15. गॅस सिलेंडर, पेट्रोल पंपावर होणा-या फसवणुकी बाबतच्या तक्रारी संबंधित गॅस कंपन्यांचे (BPC, IOC, HP)अधिकारी यांचेकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय अन्न धान्य वितरण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे करावी.
16. सध्या आॅनलाईन द्वारे खरेदी करताना होणारी फसवणूक, बॅंक खात्यामधून काढले जाणारे पैसे, अशी मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहेत.याबाबत सायबर सेल (जवळचे पोलिस स्टेशन) कडे लगेच तक्रार दाखल करावी.
17. आॅटो मिटर ने चालत नसल्यास आर.टी.ओ./ वाहतूक पोलीस यांचेकडे तक्रार दाखल करावी.
18. रुग्णवाहिकेचे दरपत्रक हे शासनाने नियमानुसार ठरवून दिलेले आहे.त्या दरपत्रका प्रमाणेच भाडे घेतले पाहिजे. परंतु न घेतल्यास ग्राहकांनी आर.टी.ओ./ वाहतूक पोलीस यांचे कडे तक्रार दाखल करावी.
19. ट्रॅव्हल्स ने वाहतूक करतेवेळी किंवा इतर तक्रार असल्यास आर.टी.ओ.कडे तक्रार करावी.
20. आपली फसवणूक झाल्यास प्रत्येक ग्राहकाने स्वस्थ न बसता संबंधित शासकीय विभागाकडे तक्रार दाखल करावी. व तक्रारींचे निराकरण न झाल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे तक्रार दाखल करावी.
गजानन प्र. पांडे
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
अ.भा.ग्राहक पंचायत
मोबाईल नंबर.9422116281
ईमेल आयडी. gppande26@gmail.com




















