भाजपच्या विचारधारा ज्यांना पटतात ते सोबत येतात – चंद्रशेखर बावकुळे

0

 

अमरावती- पक्षात येणाऱ्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो.भाजपच्या विचारधारा ज्यांना पटतात ते सोबत येतात असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांनी सांगितले. जयंत पाटलांच्या मुद्द्यावर मात्र बावनकुळेंनी बोलणे टाळले.
जयंत पाटलांची भूमिका काय ते त्यांनीच स्पष्ट करावी असे म्हणाले.राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. विरोधकांचं कामच आहे टीका करणे त्यांची चिंता नाही,
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आ बच्चू कडू यांचे ९ ऑगस्ट रोजी आंदोलन होणार आहे आणि यावर बावनकुळेंनी त्यांची भूमिका सांगितली.बच्चू कडूंना वाटतं सरकारकडून समस्या सुटल्या पाहिजेत,बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा फायदा लोकांना होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.