केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गौरवोद्गार
मुंबई (Mumbai)लक्ष्मीची कृपा एका कुटुंबावर अनेक वर्षे राहते. एकाच कुटुंबात अनेक वीर एकानंतर एक जन्म घेतात आणि वीर कुटुंब तयार होते. पण, समाजसेवेचा संस्कार सलग तीन पिढ्यांपर्यंत राहतो, हे पहिल्यांदाच पाहिले आहे. नानासाहेब नंतर आप्पासाहेब (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari ) आता सचिनभाऊ आणि त्यांचे दोन बंधू हे संस्कार पुढे नेत आहेत. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आणि आकांशाविना सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागरसुद्धा मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानातसुद्धा लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah ) यांनी काढले.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. खारघर येथील मैदानावर पार पडलेल्या विराट व देदिप्यमान सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभले. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचे काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले केले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण ही शाश्वत आहे. धर्म आणि मंत्रोच्चारांनी दिलेली शिकवण ही अल्पजीवी ठरत असते. दुसऱ्यांसाठी जगणारी माणसे या जगात कमी असल्याचे ते म्हणाले.
कार्य सुरूच राहिल – आप्पासाहेब
महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सत्ताराला उत्तर देताना श्वास चालू असेपर्यंच हे काम असेच चालू ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला. हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. हा पुरस्कार नेहमी मोठाच असतो. तो लहान कधीच नसतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचे श्रेय आपल्या सगळ्यांना जाते. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणे हे महाराष्ट्रात कुठेच झालेलं नाही. हे राज्य सरकारने केले एक महान कौतुक आहे. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. मानवता धर्म श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाच्या मनात रुजू व्हायला हवा. त्यासाठीच आमचा हा खटाटोप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.