नागपूर.(nagpur) उन्हाळ्यासोबतच शहरात आंब्याचेही (Mango) आगमन झाले. हापूस ते बैगनफल्ली अगदी गावराण आंबाही बाजारात दाखल झाला आहे. परंतु बदलत्या हवामानामुळे आंब्याचा आस्वाद घेणे टाळले जात आहे. आंब्याचा राजा हाफूस (Alphonso) एक आठवड्यापूर्वी दीज ते 2 हजार रुपये डझनाच्या वर होते. आता त्याचे दर 1हजाराच्याही खाली आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काही लोक थेट रत्नागिरीतून हाफूस आंबा बोलावून येथे विक्री करतात. परंतु मालाची पाहिजे तशी विक्री होत नसल्याने अशा विक्रेत्यांनाही माल बोलावण्यात अडचणी येत आहेत. खराब हवामानामुळे आंब्याची चवच बिघडली आहे. वादळ, पावसामुळे गळून पडलेले आंबेच बाजारात येत असल्याचा आंबे शौकिनांचा समज झाला आहे. याच समजुतीतीन नागरिकांना आवडत्या आंबट गोड चविच्या आंब्यापासून लांबच राहने पसंत केले आहे. घरोघरी तापाचे रुग्ण आहेत. यामुळे देखील आंबे खाने टाळले जात असल्याचे फळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
यंदा आंबा मोजकाच
यावेळी (mango)आंब्याचे उत्पादन कमी आहे. वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने आंब्याचा बहर गळून पडला. त्यामुळे स्थानिकच नव्हे तर बाहेरील उत्पादनही प्रभावित झाले आहे. ऐरव्ही या कालावधीत गावरानी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक व्हायची, परंतु यंदा तशी स्थिती दिसत नाही. गुजरात, दक्षिण आणि उत्तर प्रदेशातून आंबा नागपुरात येतो. रत्नागिरी व देवगड येथून हाफूस आंब्याची आवक होत असून लालबाग येथून केशर, दक्षिणेकडून बैगनफल्लीची आवक झाली आहे. सध्या गुजरात आणि उत्तर प्रदेशातील लंगडा, चौसा, सफेदा करिता महिन्याच्या अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
फळबागांचेही मोठे नुकसान
अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. राज्यात सर्वदूर हिच स्थिती आहे. त्यात आगामी काळात पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे आंबाच काय अन्य स्थानिक पिकांच्या उत्पन्नावर देखील परिणाम होणार आहे. एकतर पिकाचा दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. फळे चांगली असली तरी उत्पदान मात्र चांगलेच घटनार असल्याने चविने फळे खानाऱ्यांना जिभेला आवर घालावी लागणार आहे.