नागपूर: (Nagpur )मविआ म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. उत्तमपणे पुढे जात आहोत. या सभेसाठी अजित पवार आलेले आहेत. आम्ही एकत्र पद्धतीने पुढे जात आहोत आणि आता हवा ही मविआचीच आहे असा दावा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी नागपुरातील मविआचे सभेसाठी आले असता माध्यमांशी बोलताना केला.
कोणी काही कामानिमित्त बाहेर गेले असेल तर त्याचा अशा पद्धतीने विषय होणे योग्य नाही.राष्ट्रवादीचीही काही वेगळी भूमिका नाही. मविआमध्ये काही वेगळे बिलकुल घडत नाही आमची वज्रमुठ कायम आहे. आम्ही भक्कम राहणार असून नेहमी यशस्वी होणार आहोत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते दिसले देखील आहे. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) महाराष्ट्रात पराभूत होईल असा दावा थोरात यांनी केला.लोकसभा निवडणूक चांगल्या जागा आणि विधानसभा पूर्णपणे जिंकू असेही स्पष्ट केले.