Tiger Safari ताडोबाच्या बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्रसफारी प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार योजना

0

चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव पर्यटनाला अधिक चालना मिळावी, यासाठी ताडोबाच्या बफर झोनमध्ये दिवसभर पर्यटन सफारी सुरू (All-day tourist safari in the buffer zone of Tadoba ) करण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रथम ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून ताडोबात एकमेकांशी जोडलेल्या मार्गांवर सफारी सुरू करण्याचा विचार आहे. ताडोबा व्यवस्थापनाने मोहर्ली बफरमधील (Moherli buffer zone ) मोहर्ली-आडेगाव – देवाडा – आगरझरी – जुनोना या एकाच मार्गावर ही सफारी असणार आहे. ताडोबा कोअर क्षेत्रात पूर्णवेळ सफारी सुरू झाली असून ३५ हजार रुपये शुल्क आहे. बफरसाठी ४५ हजार शुल्क आकारले जाणार आहे. ताडोबामध्ये दिवसभर सफारी सुरू करण्याचा निर्णय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने (Executive Committee of Tiger Conservation Authority) ७ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत घेतला आहे. . Kushagra Pathak, Deputy Director of Tadoba Buffer ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक हे ताडोबात दिवसाची सफारी कशा पद्धतीची असणार आहे, याची कार्यपद्धती तयार करणार आहेत. हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर असून ताडोबा प्रशासनाने सफारीचे मार्ग निश्चित केल्यानंतरच सफारीला सुरुवात होणार आहे. सफारीचे प्रवेश शुल्क लवकरच निश्चित केले जाणार आहे. ताडोबा बफर झोनमध्ये १३ प्रवेशद्वार आहेत आणि सफारी मार्ग बहुतेक एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे कोलारा-मदनापूर-बेल्लारा आणि अलिझंजा-नवेगाव-निमढेला या मार्गात अशी सफारी राबवली जाण्याची शक्यता आहे. सध्या, ताडोबा कोअरमध्ये एक दिवसभर चालणारी सफारी भारतीय पर्यटकांसाठी ४५ हजार रुपये आहे. त्यात प्रवेश, वाहन आणि मार्गदर्शक शुल्क समाविष्ट आहे. परदेशी पर्यटकांसाठी ५५ हजार रुपये मोजावे लागतात.ताडोबा प्रशासनाने अडेगाव-देवाडा-आगरझरी मार्ग ओळखला आहे. हा मार्ग सुमारे ८०-१०० किमीचा आहे. पर्यटक सकाळपासून संध्याकाळपर्यंत सफारीचा आनंद घेऊ शकतील आणि आगरझरीमध्ये मुक्काम देखील करू शकणार आहे. लवकरच निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचे स्वागत असून यामुळे ताडोबा प्रशासनाला मोठा महसूल मिळणार आहे. अडेगाव-देवाडा-जुनोना-आगरझरी मार्गावर हॉटेल, रिसोर्टला चालना मिळणार आहे. स्थानिकांनाही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचा स्थानिक हॉटोल व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांचा विश्वास आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा