Tiger towards the city! शहराच्या दिशेने वाघ! पुन्हा एका बैलाला संपविले, आठवडयाभरापासून दहशत

0

बेसा. गेल्या महिन्याभरापासून नागपूर शहराच्या सीमेवर धुमाकूळ घालणारा वाघ (tiger roaring on the border) आता हळूहळू शहराच्या दिशेने कूच करीत असल्याची चिंता वाढली आहे. मंगळवारला हल्ल्यानंतर आता परत रविवारला पेवठा गावात (Pewtha village) शिरकाव केला. येथे शेतात बांधून ठेवलेल्या बैलाला ठार (Killed the bull) केले. पेवठा नागपूरपासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर आहे. शनिवारी रात्री तो धामणाजवळ आढळला. हुडकेश्वर, वेळाहरी (Hudakeshwar, Velahari) व आसपासच्या परिसरातच त्याचा मुक्काम आहे. रात्रीच्या वेळी आपला मुक्काम हलवित असून, या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला तातडीने हालचाली कराव्या लागतील. सध्या या वाघामुळे आसपासच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी गावकरी रस्त्यांवरून जाण्यासही घाबरत आहेत. शहरालगत असलेल्या पेवठा गावात वाघाने शेतात बांधून ठेवलेल्या बैलाला ठार केले. रविवारी सकाळी 8 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांकडून वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करण्यासह वाघाला पडकून इतरत्र हलविण्याचे आश्वासन दिले आहे.

महिन्याभरापासून वावर, सीसीटीव्हीत झळकला
शहरालगत असलेल्या 8 ते 10 किमी अंतरावरील गावात मागील 1 महिन्यापासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावराचे बळी घेतले आहे. बरीच जनावरे गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. रोजच काही ठिकाणी अशा घटना घडत आहेत. काल परोडा ते रूई मार्गावर गावालगतच्या खासगी शाळेजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौकीदाराला पट्टेदार वाघ दिसला होता.

गावात दहशत
रविवारी सकाळी पेवठा ते वेळाहरी रोडवरील एका शेतकऱ्याला पिल्यासह वाघ दिसला. आशिष मेश्राम यांच्या शेतात वाघाने एका बैलाला ठार मारले. त्यांच्या शेतात 2 बैल, 1 गाय, वासरू बांधून होते. त्यापैकी एका बैलाची शिकार करून त्याला शेताबाहेर ओढत नेले. शेतालगत एका नालीतून दुसऱ्या नालीत ओढताना वाघाला जमले नाही. नाईलाजाने वाघाला धुम ठोकावी लागला. गावातील सुधीर खारकर, विष्णू शिंगणे व पेवठ्यातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातील प्राणी वनविभागाने त्यांच्या हद्दीतच ठेवावे. आमचे पीक, पाळीव प्राणी व गावकऱ्यांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

कोट्स…
वाघाला आटोक्यात आणा
रविवारी सकाळी 8 वाजता शेतात बैल चरत असतांना अचानक बैलावर हल्ला करून वाघाने त्याचा बळी घेतल्याची माहिती हिंगणा पोलिसांकडून वनविभागाला देण्यात आली. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. नुकसान भरपाई देण्याबाबत विश्वास दिला. पण, यातून आमचे नुकसान भरून निघेल का, हा आमचा प्रश्न आहे.
-आशिष मेश्राम, शेतकरी पेवठा

वाघाची भीती कायमस्वरुपी दूर करा
वाघाच्या भीतीने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे जगणेच कठीण झाले आहे. आधीच पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता वाघाच्या भीतीने शेतकऱ्यांना शेतीवर जाणे कठीण होऊन बसले आहे. शेतातील पिके जनावरांच्या घशात जात आहे. अशात शेतकरी कसा जगेल, याची काळजीही शासनाने घ्यावी. वाघाला पकडून वाघाची भीती कायमची दूर करावी.
-सचिन इंगळे, सरपंच वेळाहरी.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा