सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा फोडाफोडीचे राजकारण करायला वेळ- अनिल देशमुख

0

 

नागपूर NAGPUR – राज्य सरकारचे चुकीचे धोरण होते त्यामुळे कापसाचे भाव पडले या वेळेस पण कापसाची तशीच परिस्थिती आहे. या भागात शेतकऱ्यांना सरकारकडून काहीच मदत नाही.अनेक पिकांचे नुकसान झाले. मागच्या वर्षी 1हजार 71कोटी ची मदत जाहीर झाली होती. सरकारचे काहीच लक्ष नाही. यवतमाळ जिल्ह्य़ात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा फोडा फोडीचे राजकारण करण्यातच मोठा वेळ आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकारला काही रस नाही असा आरोप माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ANIL DESHMUKH  अनिल देशमुख यांनी केला.

देशमुख म्हणाले,शरद पवार हे नेहमी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत असतात. आमचे सरकार असताना आम्ही कापसाची आयात केली नाही आणि भारतातील कापूस निर्यात केला. ,कापसाचा भाव वाढला पाहिजे.खर्च लक्षात घेता किमान 12हजार प्रति क्विंटल भाव दिला पाहिजे ही आमची मागणी आहे.येत्या अधिवेशनात हा प्रश्न आम्ही विचारणार आहे. या वर्षांत तरी काय करत आहे सरकार ..फोडा फोडीचे राजकारण आहे. त्यांनी राष्ट्रवादी फोडली,बाकी प्रश्नावर लक्ष देत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार करत नाही ,युवकाचे प्रश्न विचारत नाही. महिलाचे प्रश्नांवर लक्ष देत नाही.शरद पवारांनी कापूस असो की सोयाबीन असो, सगळ्या वर लक्ष दिलं.कापसाचे आयात कर 10 टक्के रद्द केले,याचं कारण कापड उद्योगाला व व्यापारला मदत करतं. यवतमाळमध्ये सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.यापुढे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर होत जाईल. अशी भीती अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.