संघटनेची दिनदर्शिका वितरण आणि पदाधिकाऱ्यांची वार्षिक सभा
नागपूर (Nagpur) : नागपूर येथील हाॅटेल हेरिटेज मध्ये आज (ता. ५ जानेवारी २०२५) राेजी तिरळे कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वार्षिक सभा पार पडली. या वेळी विदर्भातील पदाधिकारी तसेच काेअर बाॅडी पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत तिरळे कुणबी समाज संघटनेची २०२५ या वर्षातील ़डीजीटल साेयरीक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. बदलत्या काळाची गरज आेळखून संघटनेने प्रथमच डिजीटल पुस्तिका करण्याचा निर्णय घेतला हाेता. ही पुस्तिका डिजीटल असल्याने वर्षभर त्या पुस्तिकेत नवीन परिचयपत्र समाविष्ट करता येणार आहेत. आणि मर्यादित लाेकांपर्यंत न राहता पुस्तिका डीजीटल असल्याने समाजातील सर्व घटकांपर्यंत ही पुस्तिका पाेचणार आहे. तसे या वेळी दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन व वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संघटनेची मागील वर्षातील वाटचाल, आव्हाने आणि त्यावरील मार्ग आणि संघटना वाढीसाठी केलेले प्रयत्न याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनाेगत व्यक्त केले. संघटना वाढ आणि समाजहितासाठीचे काही उपक्रम पुढील वर्षात घेण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले. तसेच येणाऱ्या काळात संघटनेची समाजाला असलेली गरज आेळखून विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी माेलाचे सहकार्य केले. विशेष बाब म्हणजे यावेळी महाराष्ट्र महिला कार्यकारीणीचीही माेठ्या संखेने उपस्थिती हाेती. सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी आपले मनाेगत व्यक्त केले. तसेच समाजासाठी व विशेषता समाजातील महिलांसाठी अशा संघटनांची खूप गरज असल्याची तळमळ व्यक्त केली.
यावेळी तिरळे कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री नितीन आढाऊ, उपाध्यक्ष गिरीश काळे, सचिव श्री पराग वानखेडे, कोषाध्यक्ष श्री विक्रम मानकर, सहसचिव नरेंद्र बाडे, शहर महिला प्रमुख एकता लाकडे, मनीषा दलाल, पंकज गावंडे, हेमंत काकडे, प्रकाश कराळे, निलेश लकडे, अशोक दलाल, सचिन कापसे, संदीप खडसे, राहुल डेंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी सघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी एकत्र येऊन समाज घडवू अशी आशा बाळगून कार्यक्रमाची सांगता झाली.