Nagpur News : बालकला महोत्सवाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

0

नागपूर (Nagpur) : स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर, बालकला अकादमी नागपूर ,माय सायन्स लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालकला महोत्सवाला उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य कला सादर केली व बाल वैज्ञानिकांनी आपले विज्ञानाचे प्रयोग सादर केले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, बालकला अकादमीच्या अध्यक्षा मधुरा गडकरी, प्राचार्य डॉ.गणवीर सर, कीर्ती बालपांडे यांची उपस्‍थि‍ती होती. विज्ञान प्रयोगामध्‍ये अ गटात सिद्धांत साळवी, स्वरा टेकाडे, गौरव ढोबळे, शौर्य अंबरखाने, लावण्या मानवटकर,रियांशी मेश्राम यांनी तर ब गटात शौर्य काळबांडे, प्रज्वल भुसांडे, श्राव्या उके, रोहन शेंबेकर, यश अग्रवाल यांनी बक्षिसे पटकावली.

एकल गायन स्पर्धेत स्वरा जावळे, स्वानंदी राऊत, अनन्या देवपुजारी, व्योम ऐरणे व ऋत्विक भांडारकर यांनी बक्षिसे पटकावली. एकल नृत्य स्पर्धेत विविध गटात स्वरा कारमोरे, वैदेही पेठे, काव्या पिंजरकर, पूर्वीका डांगरा व आरुषी ढोबळे, झलक पंचमिया, दिव्या झा, प्रणवी शिंगारूप, पूजल राणा,गार्गी दुबे चमकले. विजेत्यांना प्रमाणपत्र, मेडल व भेटवस्तू वितरीत करण्‍यात आल्‍या.