
चंद्रपूर (Chandrapur) :- पर्यावरण संवर्धन हि काळाची गरज असून प्रत्येकांनी ती आपली जबाबदारी म्हणून स्वीकारत पर्यावरणात होणारे गंभीर बदल लक्षात घेऊन अधिकाधिक वृक्षारोपण करून पर्यावरणाचे ऋण फेडणे गरजेचे आहे. हे सामाजिक उद्धिष्ट लक्षात घेवून ओमॅट वेस्ट लिमिटेड (श्री सिद्धबेली इस्पात लिमिटेड ) च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्योग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महाप्रबंधक रवि चावरे यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली.
उद्योगाचे प्लांट हेड अविनाश डोंगरे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी ॠिषभ मित्तल, महाप्रबंधक सतीश मूलकलवार, अमरेंद्र सिंह ठाकूर, ओमनरेश भदोरिया, मनीष वडस्कर, अभय सिंह, दिपक पराळे, सुखेंद्र कुशवाहा, कपिल जैन, चेतन चोहिवाल, विजय कनोजे, आनंद मिश्रा, मृत्युंजय सिंह, राजकुमार दंता, जयंत गाडेकर, दिनेश वंजारी, एस न के रेड्डी, प्रतीक जोशी, धनंजय पाटील, आशिष ठाकरे, अभिषेक खुपत, सर्वेश यादव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास नक्कीच मदत होते. आज पर्यावरण दूषित झाल्यास अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. वाढते तापमान व हवामान बदल यावर आपण अधिकाधिक वृक्षारोपण करून या भीतीदायक परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. निसर्गाचे जतन व्हावे या समर्पक भावनेने प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे अशी समर्पक भूमिका प्लांट हेड अविनाश डोंगरे यांनी आपल्या संबोधनातून यावेळी स्पष्ट केली.
वृक्षारोपण (Tree Plantation) हि आता सामाजिक जबाबदारी असून येणाऱ्या पिढीला त्याचे महत्व विषद व्हावे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या ओळींचा खरा अर्थ समाजात रुजावा व पर्यावरण सदैव सुजलाम सुफलाम असावे या भावनेतून जागतिक पर्यावरण दिनी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ॠिषभ मित्तल यांनी दिली.