
चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आढावा बैठक संपन्न
चिमुर (Chimur) :- राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे 10 वे राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथे 7 आगस्टला संपन्न होणार आहे.यासाठी चिमुर, वरोरा, सिंदेवाही,नागभीड, ब्रम्हपुरी ह्या पाचही तालुक्यातील ओबीसी बांधवांची आढावा बैठक चिमुर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था येथे संपन्न झाली.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या आढावा बैठक दि.5 जुन ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.दहाव्या अधिवेशनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भुमिका काय असेल ? हे आढावा बैठकीत स्पष्ट केले.महाअधिवेशनात ओबीसी समाजाच्या हिताचे ठराव पास करून केंद्र सरकार व राज्य सरकारला पाठवले जातात.हे ठराव पुर्ण करण्यासाठी सतत उठाव व आंदोलने केली जातात.ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ५२ जी आर पास केले.तसेच प्रत्येक तालुक्याचे गोवा अधिवेशनाबाबत काय नियोजन आहे.याबबत आढावा बैठक पार पडली.
आढावा बैठकीत प्रमुख अतिथी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे जिल्हाध्यक्ष भावना ताई बावणकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष मारोतराव अतकरे, ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे,राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक माधुरीताई रेवतकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास कामडी, सुत्रसंचलन बालू सातपुते यांनी केले तर आभार मिनाक्षीताई बंडे यांनी केले.