तापी नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू

0

 

जळगाव (Jalgaon) – चोपडा तालुक्यातून वाहणाऱ्या तापी नदीच्या पाण्यामध्ये आंघोळीसाठी आठ वर्षे वयाची मुलगी व चार वर्षे वयाचा मुलगा गेला असता त्यांना पाण्याच्या अंदाज न आल्याने पाण्यात बुडत त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना चोपडा तालुक्यातील दोनवाडे गावालगत असलेल्या तापी नदीच्या पात्रात घडली.

आदिवासी समाजाचे हे कुटुंब कामानिमित्त इकडे आले होते. होळीला आदिवासी समाजाचा भोंगऱ्या उत्सवानिमित्त गावी गेले व उत्सव संपल्यानंतर परत काम धंद्यासाठी येऊन काही दिवसच झाले होते. काल सायंकाळी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता तापी नदीत सोडलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.