शिंदे गटाचे आणखी दोन मंत्री विरोधकांच्या रडारवर, संजय राठोड, शंभुराज देसाई ही अडचणीत?

0

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक असून शिंदे मंत्री मंडळातील आणखी दोन मंत्री विरोधकांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Winter Session) भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना लक्ष्य केल्यावर आता संजय राठोड आणि शंभुराज देसाई हे आणकी दोन मंत्री आता विरोधकांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही मंत्री अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, मात्र सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने शंभूराज देसाई यांच्यावर केला आहे. महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक-24 मधील शेत जमिनीवर अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

विशेष म्हणजे ही जमीन ही स्वतः शंभूराजे देसाई यांच्या नावावर आहे. स्वतः लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनीच अतिक्रमण तथा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. संजय राठोड यांनी 2019 मध्ये 5 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले. गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची तरतूद नाही. 5 एकर जागा नियमानुकूल करण्याचे आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले होते, असा आरोप आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा