सर्दी, खोकला, व्हायरल डायरियाच्या साथीने केले बेजार
अकोला. विदर्भात (Vidharbha) गेल्या चार ते पाच दिवसांपासून किमान तापमानात सलग घट होत आहे. त्याचवेळी ढगाळ वातावरणही आहे. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्यासह व्हायरल फिवर, अस्थमा व डायरियाचे रुग्ण वाढत (Due to the environment, the patients of cold, fever, cough along with viral fever, asthma and diarrhea are increasing) आहेत. या स्वरुपातील रुग्णाचे प्रमाण शहरातील खासगी दवाखान्यांच्या बाह्यरुग्ण विभागात ३० ते ५० टक्के आढळून येत आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील थंडीचा जोर आणि ढगाळ वातावरण यामुळे लहानग्यांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे बालरोग तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये खास करून व्हायरल डायरिया, अस्थमा, सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून येत आहेत. एक ते पाच वयोगट आणि शाळकरी मुलांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे अधिक आहेत. तर दुसरीकडे अकोला महापालिकेच्या हद्दीसह जिल्ह्याच्या विविध भागात गोवर संदिग्ध बाल रुग्ण आढळून येत आहेत.
वातावरण बदलामुळे उत्पन्न होणाऱ्या तक्रारी आणि गोवरची काही लक्षणे सारखी असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन बालरोगतज्ञांच्या वतीने करण्यात येत आहे. खास करून ज्या मुलांमध्ये तापीसह अंगावर पुरळ दिसून येत आहे, अशा मुलांबाबत तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करावे.
शालेय मुलात यंदा साथीचे आजार अधिक आढळले. हॅन्ड फूट माऊथ डिसीजचे रुग्ण वाढले. डायरिया, व्हायरल, डेंगूसदृश्य तापांच्या रुग्णांनी रुग्णालय भरली. गोवर संशयित, व्हायरल, डायरियाची रुग्ण आढळल्याने मुलांत लक्षण दिसल्यास त्यांना शाळेत पाठवू नका.
खबरदारी घेण्याची सूचना
लहान मुलांना उघड्या थंड वातावरणात बाहेर काढू नका. मुलांच्या पूर्ण अंगाला गरम कपड्याने संरक्षण द्या. शक्यतो सकाळी आणि रात्री दुचाकीवरून प्रवास टाळा. एक वर्षाआतील शिशूंसाठी घरातील वातावरण उबदार ठेवा.
सर्दी, खोकल्याची औषधे
वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्याची लक्षणे दिसून येत आहेत. श्वासोच्छवासादरम्यान घरघर वाजणे याशिवाय अस्थमाच्या तक्रारी मुलांमध्ये दिसून येत आहेत. – डॉ. विजय चव्हाण, बालरोगतज्ज्ञ
व्हायरल डायरिया
लहान मुलांत व्हायरल डायरिया दिसून येत आहे. याशिवाय गोवर संदिग्ध रुग्णही आढळत आहेत. सद्यःस्थितीत गोवर संशयित असलेल्या चार ते पाच रुग्णांवर सर्वोपचार उपचार सुरू आहेत. – डॉ. विनीत वरठे, बालरोगतज्ज्ञ, सर्वोपचार रुग्णालय.
काही लक्षणे सारखी असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन बालरोगतज्ञांच्या वतीने करण्यात येत आहे. खास करून ज्या मुलांमध्ये तापीसह अंगावर पुरळ दिसून येत आहे, अशा मुलांबाबत तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करावे. लहान मुलांना परस्पर औषधे देऊ नका
लहान मुलांना परस्पर औषधे देण्याची जोखीम पालकांनी घेऊ नये. डायरियामुळे जुलाब झाल्यास ओआरएस वगळता इतर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये. ओआरएस घेतल्याने रुग्णास फायदा होतो. शरीरातील खनिज आणि पाण्याची कमतरता भरून निघते. याशिवाय मीठ आणि साखरेचं पाणी घेतल्यासही फायदा होता. यामुळे अशक्तपणा कमी होतो.