केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ठळक वैशिष्टे

0

बजेटमध्ये मध्यमवर्गाला केंद्र सरकारकडून दिलासा

पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून वैध असेल – निर्मला सीतारामन

भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी तीन उत्कृष्ट संस्थांची स्थापना – निर्मला सीतारामन

80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप, पुढील वर्षभर ही योजना सुरू होणार

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट

अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजाराच्या सेसेंक्समध्ये ५००, तर निफ्टीतही १४७ अकांची वाढ

ज्येष्ठ नागरिकांसाठी डिपॉझीट मर्यादा १५ वरून ३० लाखांपर्यंत वाढली

महिला बचत योजनेत २ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीत सुट

बॅटरीवर चालणाऱ्या व इलेक्ट्रॉनिक वस्तु स्वस्त होणार

इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार

..७ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही

यापूर्वी ही मर्यादा ५ लाखांपर्यंतच होती,ही सुट नव्या कर रेजीमसाठी लागू 

नव्या कर रेजीमानुसार ९ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना ४५ हजार रुपये कर भरावा लागला. २० टक्के बचत होणार

केंद्र सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प: अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे लोकसभेत भाषण

* निर्मला सितारामण यांच्या भाषणातील ठळक मुद्दे-

* भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर
* कोवीड परिस्थितीतही अर्थव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश
* गरीबांना अजुन एक वर्षापर्यंत मोफत धान्य : योजनेला मुदतवाढ
* भारतात डिजिटल आर्थिक व्यवहारात अभूतपूर्व वाढ

* देशातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारांना सहभागी करून घेणार
* युवकांना रोजगारासाठी अर्थसाहाय्य आणि प्रशिक्षण
* बजेटमध्ये सात मुद्द्यांवर भर. सर्वसमावेशक विकासावर भर
* कॄषी क्षेत्रासाठी डिजिटल इंन्फ्रास्ट्रक्चर, कॄषीवर्धक निधी, शेतकऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देणार : वीस हजार कोटींची कर्जे योजना
* मासेमारांसाठी सहा हजार कोटींचा विशेष निधी : मत्स्य पालन योजना
* युवा, रोजगार आणि विकासावर भर देण्याच्या संकल्पनेवर अर्थसंकल्पाची रचना

* राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना : विद्यार्थ्यांसाठी विविध भाषांमध्ये पुस्तके
* एकलव्य निवासी विद्यालयांसाठी ३८ हजार शिक्षकांची नियुक्ती करणार