रिलायन्सचे मुकेश अंबानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानींची पिछेहाट

0

      मुंबई : हिंडेनबर्ग संशोधन संस्थेच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर खाली आल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असून या रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले (Richest Man Of India) आहेत. फोर्ब्सने जारी केलेल्या श्रीमंतांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84.3 अब्ज डॉलर असून शेअर बाजारातील नुकसानीमुळे गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य 83.9 अब्ज डॉलरपर्यंत घसरले आहे.

जागतिक क्रमवारीनुसार, गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत 10 व्या तर मुकेश अंबानी नवव्या क्रमांकांवर आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आले आहेत. तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.
अलिकडेच हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने अदानी ग्रुप विरुद्ध जारी केलेल्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत. त्याचा फटका अदानी ग्रुपला मोठ्या प्रमाणात बदला आहे. अदानी ग्रुने आरोपांचा इन्कार करीत हिंडेनबर्गविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्याची तयारी सुरु केलीय.
फोर्ब्सने जारी केलेल्या माहितीनुसार, आता श्रीमंत व्यक्तींच्या जागतिक क्रमवारीत लुई व्हिटनचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत (Richest Man in the World) व्यक्ती आहेत. 214 अब्ज डॉलर संपत्तीसह ते श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 178.3 अब्ज डॉलर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ॲमेझॉनचे मालक जेफ बेजोस आहेत. त्यांची एकूण संपत्ती 126.3 अब्ज डॉलर आहे.

 

राजस्थानी मसाला टिक्कड आणि बाजरे की खिचडी EP.NO 79| Rajasthani tikkar recipe |Bajra khichdi recipe