आठवले कुणाला म्हणाले, 12 वाजविणार !

0

 

वाशिम vashim – राज्यभरात महायुतीचे मेळावे होत असून प्रत्येक जिल्ह्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, महायुतीच्या मेळाव्यात जो बॅनर लावण्यात येतो त्यावर फोटो खाली न लावता वर लावण्यात यावा, तसेच आमच्या पक्षाचा आदर करण्यात यावा, आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा आदर करण्यात यावा अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा फॉर्म्युला संदर्भात छेडले असता प्रकाश आंबेडकरांसाठी अकोला मतदार संघ आम्ही सोडला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जो 12, 12, 12 चा फॉर्म्युला सांगितला आहे, तो चांगला आहे. तो जर महाविकास आघाडीने स्वीकारला तर आम्ही लोकसभेमध्ये त्यांचे 12 वाजवू असा इशाराही दिला.