

मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा जवळकर या आता “तनहा” या नव्या व्हिडिओ सॉंगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. २३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून श्रद्धा जवळकर यांच्या अभिनयाची विशेष चर्चा रंगताना दिसत आहे.
श्रद्धा जवळकर यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात नागपूर येथील थिएटरमधून केली. दिग्दर्शक प्रवीण खापरे यांच्या “बायोपिकश्री” मधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर मुंबईमध्ये “प्राणदा” (अल्ट्रा झकास) या मराठी चित्रपटात दिग्दर्शक योगेश भोसले यांच्यासोबत त्यांनी काम केले.
याशिवाय त्यांनी “रंग माझा वेगळा”, “लग्नानंतर होईलच प्रेम” यांसारख्या मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत.
विविध व्हर्टिकल सिरीजमध्येही त्यांनी काम केले असून डोंबिवली येथील पटेल आर मार्टच्या जाहिरातीतदेखील त्या झळकल्या आहेत. “धुआँ” या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ह्याचे दिग्दर्शक सुनील धर्माधिकारी यांनी केले होते.

एका मोठ्या चित्रपटात छोटा रोल करत असताना त्या चित्रपटाचे सहनिर्माते दीपक सिंग आणि दिग्दर्शक अभिजीत वारंग यांनी श्रद्धा जवळकर यांना “तनहा” या सॉंगसाठी संधी दिली. या गाण्यातील त्यांचा ग्लॅमरस अंदाज आणि भावपूर्ण अभिनय प्रेक्षकांना विशेष भावत आहे.
विशेष म्हणजे अभिनयासोबतच श्रद्धा जवळकर यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही अनेक मानाचे किताब पटकावले आहेत. त्यांनी “मिसेस मंगळूर २०१८” मध्ये टॉप १२ मध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर “मिसेस सेंट्रल इंडिया २०१९” मध्ये नागपूरमधून विजेतेपद मिळवले तसेच “मिसेस ग्लॅमर इंडिया २०२१ पुणे विनर” हा किताबही आपल्या नावावर केला.
“तनहा” या व्हिडिओ सॉंगचे दिग्दर्शन पराग सावंत यांनी केले असून हे गाणे “मेलोडी स्टुडिओ” या युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यानंतर आणखी चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा श्रद्धा जवळकर यांनी व्यक्त केली आहे.
माहिती
गाण्याचे नाव : तनहा
दिग्दर्शक : पराग सावंत
कलाकार : श्रद्धा जवळकर
युट्युब चॅनल : मेलोडी स्टुडिओ
प्रदर्शित तारीख : २३ मे
















