पटलं तर मतं द्या, नाही तर….!

0

नितीन गडकरी या़चा षटकार

नागपूरः “ मी लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. कोणतरी नवीन येईल,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. गडकरी यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच (Central Minister Nitin Gadkari on his Political Career) चर्चा आहे. वनराई फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते असून ते सडेसोड बोलण्यासाठी प्रसिद्धच आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आपल्या राजकीय वाटचालीसंबंधी अतिशय सडेतोड भावना व्यक्त केल्या आहेत. गडकरी म्हणाले की, राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीति म्हणजे लोकनीति, धर्मनीति आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणे अपेक्षित आहे, असेही गडकरी म्हणाले.