संघटनेच्या योग्य बांधणीमुळे जलसेवा कर्मचारी महासंघ यशस्वी: सुधीर मुनगंटीवार

0

नागपूर : समर्पित कार्यकर्ते आणि संघटनेची योग्य बांधणी यामुळे महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघ यशस्वी झाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आण मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय मजदूर संघप्रणित महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघाच्या 13 व्या त्रैवार्षिक अधिवेशनाला संबोधित करतांना नुकतेच ते बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना पुढे सांगितले की जल कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचारी असताना जीवन प्राधिकरण स्वीकारून मोठा त्याग एके काळी केला. महाराष्ट्राला पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे अतिशय महत्वाचे काम जल कर्मचारी करित असतात. विश्वगौरव पंतप्रधान मा.श्री नरेंद्रभाई मोदींनी सुरू केलेल्या राष्ट्रीय फ्लॅगशिप कार्यक्रमात “जल जीवन मीशन” हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रमही जल कर्मचाऱ्यांमुळेच यशस्वी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन म्हणून आम्ही ठामपणे तुमच्या सोबत आहोत असेही ना.श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीत अन्नदानाचे जितके महत्व आहे त्यापेक्षा अधिक महत्व तहानलेल्याला पाणी पाजण्याचे आहे असे सांगून ना.श्री मुनगंटीवार म्हणाले की संत एकनाथांनी तर तहानलेल्या प्राण्यानाही पाणी पाजले होते.
भारतीय मजदूर संघाने कामगारांमध्ये “देश के लिये करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम” या घोषणेसह “राष्ट्र प्रथम” ही भावना रुजवली आहे, असे सांगून ना.श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की संघटनेचे कार्यातले सातत्य हे कौतुकास्पद आहे. नेहमी पुढाऱ्यांसमोर घोषणा दिली जाते की, “आगे बढो, हम आपके साथ है” मात्र आज मीच तुम्हाला सांगायला आलो आहे की,”कर्मचारी बंधू आप आगे बढो, हम आपके साथ है,” असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर श्री लक्ष्मणराव पुरंदवार, श्री रवींद्र हिमते, श्रीमती नीताताई चौबळ, श्री गजानन गटलेवार, श्री सी.व्ही. राजेश, श्री वसंतराव पिंपळापुरे, श्री टी.जी. पिंजण, श्री प्रकाश बोरे, श्री निशिकांत ठोंबरे, शारी माधव लोहे, श्री अरविंद परदेशी हे भारतीय मजदूर संघाचे व महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.