विचित्र कपड्यांची फॅशन करणाऱ्या उर्फी जावेदवर भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ का संतापल्या?

0

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद ही आपल्या विचित्र कपड्यांमध्ये सातत्याने वादाचा विषय ठरत असते. फॅशन म्हणून परिधान केलेल्या तिच्या कपड्यांवर सोशल मिडियावर सातत्याने संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत असतात. त्यात काही प्रतिक्रिया अतिशय टीका करणाऱ्या असतात. मात्र, आता तिच्या फॅशनमुळे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (State BJP Women Wing President Chitra Wagh on Urfi Jawed) या देखील चांगल्याच भडकल्या आहेत. वाघ यांनी उर्फी जावेदला “नंगटपणा करणारी बाई” म्हणत तिच्या अटकेची मागणी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यानी मुंबई पोलिसांना आव्हान केले आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात, “श्शीSSS…अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.”
एकीकडे राज्यात महिलांविरुद्धच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे असे विकृती पसरविणारे प्रयत्न होत असून मुंबई पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे व गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत हे ट्वीट केले आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटची सोशल मिडियावर बरीच चर्चा असून अनेकांनी त्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. मात्र, काहींनी उर्फी जावेदचेही समर्थन केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा