अहमदाबाद : चीनसह जगभरात करोनाचा हाहाकार सुरू असतानाच आता भारताच्या चिंताही वाढत आहेत. ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेला व्हेरियंट “XBB1.5” चा रुग्ण भारतात सापडला (Corona New Variant ) असून गुजरातमध्येच याचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती आहे. भारतीय सार्स कोव-२ जीनोमिक्स
काही दिवसांपूर्वी भारतात bf.7 व्हेरियंटचे रुग्ण आढळले होते. त्यातच आता XBB1.5 रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाच्या या प्रकारामुळेच न्यूयॉर्कमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. या व्हेरियंटचा भारतासह जगभरातील ३४ अन्य देशात फैलाव झाला आहे. ओमिक्रॉनच्या प्रकारातील हा सर्वात धोकादायक व्हेरियंट असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.
महाराष्ट्रात सध्या १०० टक्के नमुन्यांचे जिनोमिक सीक्वेंसिग होत असून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग, रॅपिट टेस्टिंग होत आहे. यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवत आहोत, अशी माहिती तज्ज्ञ अधिकारी डॉ. प्रदीप आवटे दिली आहे. सध्या महाराष्ट्रात XBB व्हेरियंटचे २७५ हून अधिक रुग्ण आहेत. मात्र, XBB.1.5 हा वेगळ्या प्रकाराचा व्हेरियंट आहे. त्याच्या प्रसाराच्या क्षमतेबाबत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे नवे व्हेरियंट BF.7 चीन, अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्कसह जगभरातील इतर अनेक देशांमध्ये आढळले आहे. मात्र, चीनमध्ये या व्हेरियंटचा फैलाव अधिक आहे. भारतातही त्याची प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.