काय ते ताडोबा, काय ते जंगल, काय ते वाघ….

0

शहाजी पाटील म्हणाले, सगळं एकदम ओक्के आहे…

नागपूर : राज्यातील विद्यमान सरकारमधील काही आमदारांनी केलेल्या ( Gujarat, Guwahati ) गुजरात, गुवाहाटी यात्रेदरम्यान गाजलेल्या काय ते जंगल, काय ती डोंगरं…असे गाजलेले विधान करणारे आमदार शहाजी पाटील परवा चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा ( Tadoba ) येथे पर्यटनाला गेले होते. जंगल सफारी आणि व्याघ्र दर्शनानंतर त्यांनी काही कार्यकर्त्यांसमक्ष केलेले विधान, गुवाहाटी दौऱ्याची आठवण करून देणारे होते. काय ते ताडोबा, काय ते जंगल, काय ते वाघ…सगळं कसं ओक्के मधे हाये…ही त्यांची प्रतिक्रिया एकीकडे ताडोबाच्या नैसर्गिक वैभवाला दाद देणारे, वाघ बघायला मिळाला म्हणून आनंद व्यक्त करणारे तर दुसरीकडे त्यांच्या एकूणच दिलदार स्वभावाची प्रचीती घडवून आणणारे होते.


हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter session ) निमित्ताने नागपुरात दाखल झालेले लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार यांच्यापैकी बऱ्याच जणांनी शनिवार, रविवारचे निमित्त साधून ताडोबा वारी केली. शहाजी पाटील यांचाही त्यात समावेश होता. निवास, जंगल सफारी आणि व्याघ्र दर्शन आटोपल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया मात्र सर्वदूर चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काळात ताडोबात निर्माण झालेल्या सोयी, जंगल, पशु, पक्षी आणि एकूणच जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठीच्या प्रयत्नांचे यशही त्यातून अधोरेखित होते, ते वेगळेच.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा