केंद्रीय प्रयोगशाळा कधी सुरू होणार?

0

 

(Amravti)अमरावती – 2021 साली राज्यात चार ठिकाणी केंद्रीय लेबोरेटरी उभारणीसाठी मान्यता मिळाली यातून एक केंद्रीय प्रयोगशाळा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय 2019 मंजूर झाली होती. कोविड काळानंतर प्रयोग शाळेसाठी सव्वा कोटीचा निधी देखील मंजूर झाला. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 70 लाखाची इमारत उभी करण्यात आलेली आहे. मात्र, केवळ यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाअभावी ही प्रयोगशाळा अद्यापपर्यंत सुरू होऊ शकलेली नाही.आता या रुग्णालयाचे शहरात असलेल्या इतर प्रयोगशाळेसोबत साटेलोटे तर नाही ना? अशी देखील शंका व्यक्त होत आहे. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास अमरावती जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यसह मध्य प्रदेशातील रुग्णांनाही याचा लाभ मिळू शकतो.

अत्याधुनिक सुविधा व 24 तास सेवा देणारी ही लेबोरेटरी विदर्भातील एकमेव लॅबोरेटरी असणार आहे. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास सिकलसेल, चिकनगुनिया इत्यादी सह सर्वच रक्ताच्या चाचण्या या ठिकाणी मोफत होणार असल्याची माहिती डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती यांनी दिली.