विदर्भातील काँग्रेसचे उमेदवार कोण ?

0

 

 -पटोले,वडेट्टीवार, ठाकरे,राऊत यांना लढण्याचे आदेश

नागपूर (Nagpur)– राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या 15 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे फायनल झाली असून गुरुवारी किंवा शुक्रवारी दिल्लीतून या नावांची घोषणा केली जाणार आहे. अनेक बड्या नेत्यांनी मैदानात उतरण्याचे किंवा उमेदवार देत भाजपशी दोन हात करण्याचे आदेश हायकमांडने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साधारणतः होळी,धुळवड आटोपल्यावर 26,27 मार्च या शेवटच्या दोन दिवसातच महत्वाचे,प्रमुख पक्षांचे उमेदवार नामांकन अर्ज भरणार असल्यानेही महायुती,मविआच्या यादीत फेरफार होऊ शकतो अशी माहिती आहे.

महायुतीचे देखील वेट अँड वॉच असून शेवटच्या टप्प्यात उमेदवार,मतदारसंघ बदल करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील जागांवर धक्कातंत्र वापरतील अशी शक्यता आहे. काँग्रेसने अंतिम स्वरूप दिलेल्या मतदारसंघात नागपूर -आ विकास ठाकरे,रामटेक-डॉ नितीन राऊत, अमरावती -आ बळवंत वानखेडे,गडचिरोली-डॉ नामदेव उसेंडी, चंद्रपूर -आ विजय वडेट्टीवार किंवा प्रतिभा धानोरकर, भंडारा -नाना पटोले अशी ही प्रमुख नावे आहेत. मात्र, आज घोषणा होण्याची अपेक्षा कमीच असल्याचे बोलले जाते.