महाविकास आघाडीने मर्दानगी का दाखविली नाही? ना . सुधीर मुनगंटीवार

0

मुंबईः महाराष्ट्राच्या वाहनांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हल्ले करण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर ‘नामर्द’, ‘षंढ’ सरकार म्हणत टीका केली आहे. राऊत यांच्या टीकेला सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी प्रत्युत्तरही दिले आहे. (Sanjay Raut allegations) “अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाविकास आघाडीने मर्दानगी का दाखविली नाही”, असा सवाल राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांना विचारला. “स्वत: आत्मचिंतन करून स्वत:ला उपमा देण्याचे काम तेच करू शकतात”, अशी खोचक टीकाही मुनगंटीवार यांनी केली आहे. तर “संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते”, असा अप्रत्यक्ष मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.


शंभुराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक आरोप करत आहेत. त्यांनी आपले तोंड आवरावे. तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहात. बाहेरचे वातावरण तुम्हाला सूट होत नाही, असे तुमच्या बडबडण्यावरून वाटत आहे. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी अशी वक्तव्ये करणे टाळा, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे.


“संजय राऊत हे सरकार षंढ असल्याचे म्हणतात. संजय राऊत स्वत: कोण आहेत? ज्यांना १५ दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. ते पूर्ण करण्याच धाडसही संजय राऊत यांच्यात नाही. आम्ही शेपूट घातले म्हणणाऱ्या राऊतांना कर्नाटकात जाण्याची हिंमत करता आलेली नाही. यावरून ते किती घाबरले होते, हे कळते. मग ते किती मोठे षंढ आहेत, असे आम्ही म्हटले तर चालेल का, असा सवाल शंभुराज देसाई यांनी केला आहे.

*व्हेज चायनीज राईस विथ सॉस आणि कळहण रेसिपी | Veg Chinese Rice with Sauce & Kalhan Recipe | Epi 49*