Home Top News भाजपसोबत जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार-अशोक चव्हाण

भाजपसोबत जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार-अशोक चव्हाण

0

नांदेड-आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची शक्यता माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. चव्हाण हे काँग्रेसच्या ११ आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना चव्हाण यांनी तुर्तास या चर्चांना पूर्णविराम दिलाय. मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता नेमकी कुठून व्यक्त होत आहे, असा सवाल करीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी नांदेडमध्ये झालेल्या बैठकीतच मी माझी भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. चव्हाण यांनी यापूर्वीही अशा शक्यता फेटाळल्या आहेत. अलिकडेच डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये आयोजित एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणाचा स्तर घसरत असून ते आयपीएल सारखे झाले असल्याचे मत व्यक्त केले. आयपीएलमध्ये जशी खेळाडूंची बोली लागते तशी आता नेत्यांची बोली लावली जात असल्याची भावना व्यक्त केली होती. आपण यात कुठे आहोत हा माझ्या सारखा माणसाला प्रश्न पडला आहे, असेही ते म्हणाल होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांवरही टीका केली. वडेट्टीवार काही बोलले की मला विचारतात व मी काही बोललो की त्यांना विचारतात, असे प्रसार माध्यमांचे सुरु आहे. अजितदादा आता अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी इकडे यायला हरकत नाही, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.