यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
सन १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १ मे १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली.
१९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली
यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी कराड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.
– बालपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांची आई आणि काका यांनी त्यांचा सांभाळ केला. यशवंतरावांना आईकडूनच आत्मनिर्भरता आणि देशभक्तीची शिकवण मिळाली होती.
– त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए. एलएल. बी. झाले.
– 930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला.
– 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
– दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली व ते काँग्रेसमध्येच राहिले व 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सामील झाले.
– सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते; त्यामुळे प्रतिसरकारशी त्यांचा तसा फारसा संबंध राहिला नव्हता.
– 1946 साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले.
– 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली व 1952 च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले.
– द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 1 नोव्हेंबर 1956 रोजी सूत्रे हाती घेतली. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले.
– पुढे 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री आणि 1974 पासून परराष्ट्रमंत्री बनले.
– महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर ज्यांचा प्रभाव होता असे ते राजकारणी होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासोबतच सामाजिक कार्य आणि साधी राहाणी हे त्यांचे वैशिष्टय होते.
– भारताच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असले तरी सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडलेली होती.
– महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना यशवंतरावांनी पुढे आणले. यातील एक नाव म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे यशवंतरावांना राजकीय गुरु मानतात.
“यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाला मूल्याधिष्ठित दृष्टिकोन दिला. त्यांची कर्तृत्वशक्ती आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते.””यशवंतराव चव्हाण हे केवळ नेते नव्हते, ते महाराष्ट्राच्या आत्म्याचा आवाज होते. त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश कायम राहील