
नागपूरच्या सरोज अंदनकर यांच्यासह मान्यवरांचा गौरव
पुणे: पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे ५ एप्रिल २०२६ रोजी ‘युवा संकल्प महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६’ हा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. “कार्य तुमचे, कर्तव्य आमचे” हे ब्रीद घेऊन युवा प्रबोधन साहित्य मंच, ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था आणि बंडखोर साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात नागपूरच्या प्रसिद्ध कवियत्री सरोज अंदनकर कवयित्री यांना त्यांच्या दर्जेदार काव्यनिर्मिती आणि साहित्यातील बहुमुल्य योगदानाबद्दल ‘आदर्श साहित्यरत्न भूषण’ पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले. त्यांच्या कवितांमधून उमटणारे सामाजिक भान आणि साहित्यिक मूल्य लक्षात घेऊन या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
तसेच, ज्ञानदायिनी संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. मधुकर सरवदे यांना त्यांच्या २५ वर्षांतील सामाजिक कार्याबद्दल ‘राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. मुंबईचे ऍड. चंद्रकांत निकम यांना रेल्वे प्रवाशांच्या प्रश्न
















