Home Artical Blog भाषेच्या गोडीतून साहित्य फुलताना मिळाले महिलांना मानाचे स्थान

भाषेच्या गोडीतून साहित्य फुलताना मिळाले महिलांना मानाचे स्थान

0

साहित्याच्या व्यासपीठावर केला शब्दवेलने नारीशक्ती सन्मान

शब्दवेल नारीशक्ती सन्मान रविवार दि. ५- एप्रिल २०२६ रोजी पुणे येथे झालेला सन्मान सोहळा आणि कविसंमेलन अतिशय सुंदर पद्धतीने पार पडले आणि ज्या महिला घर, नोकरी हे सर्व सांभाळून इतर क्षेत्रातही ज्यांचे बहुमुल्य योगदान आहे कला,साहित्य इत्यादी यांची निवड करून त्यांना जो नारीशक्ती सन्मान जाहीर करण्यात आला तो आज खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देणारा आणि प्रोत्साहन पर ठरला.
विशेष म्हणजे नियोजित वेळेत कार्यक्रम सुरू करून यशस्वीपणे हा कार्यक्रम संपन्न झाला
त्याचप्रमाणे मित्र,मैत्रिणीच्या गाठी भेटी, झाल्या नवोदितांच्या कविता, अर्थपूर्ण असून शिस्तबद्ध कार्यक्रम , प्रत्येक कवींना न्याय देऊन त्यांचा सन्मान हे म्हणण्यापेक्षा त्यांच्या लेखणीचा सन्मान झाला.

मला माझ्या दुसऱ्या पुरस्कारा करिता वानवडी येथे जायचे होते

आदर्श साहित्यरत्न भूषण पुरस्कार

सोहळ्याला परंतु मधेच उठून जाणे योग्य वाटले नाही आणि सर्वांच्या कविता पण ऐकण्याची इच्छा असल्याने थांबले काव्य सन्मान प्राप्त झाला.
त्यानंतर शेवटी कुणाला भेटता आले नाही माफ करा कारण अंतर पण बरेच होते त्यामुळे निघून जावे लागले
आणि सगळे कार्यक्रम करून रात्रीच नागपुरसाठी परतायचे होते

आयोजन, नियोजन उत्कृष्ट होते पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित अटेंड करता आला…
कवि संमेलनाच्या अध्यक्षा अगदी जवळच्याच होत्या ( मैत्रीण)
मा. शितल राऊत, सूत्रसंचालन खूप सुंदर झाले
आयोजक आणि सर्व कार्यकर्ते
संमेलनाध्यक्ष, प्रमुख अतिथी
त्याचप्रमाणे
मा. प्रवीण बोपुलकर सर,
मा. अश्विनी अतकरे मॅडम,
मा. देवेंद्र इंगळकर सर,
मा. अमोल चरडे सर यांचे मनापासून आभार व्यक्त करते आपल्यामुळे मला ही संधी मिळाली अंतर लांबचे असून देखील साहित्यासाठी जी तळमळ आहे तिथे लांबचा किंवा पैशाचा विचार केला जात नाही
आणि खऱ्या अर्थाने साहित्य हा माझा आत्मा आहे .साहित्य आणि सामाजिक कार्य यात मी स्वतः ला झोकून देते
जगण्याला उभारी देण्याचे काम हे साहित्य करतं
आणि आज जी काही ओळख, आणि पुरस्कार मिळाले ते केवळ साहित्यामुळेच
तसेच नव नवीन साहित्यिकांच्या भेटी होतात हा एकमेव उद्देश
दोन्ही सन्मान खुप सुंदर आहेत आयोजक आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार आणि धन्यवाद
सर्व पुरस्कारार्थी नारीशक्ती आणि कवी, कवयित्री यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
सर्वांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा…
पुनश्च मनापासून धन्यवाद 🌹🙏

सौ. सरोज अंदनकर नागपूर