इस्रायली राजदूतानं मागितली भारताची माफी, काय प्रकरण घडले?

0

नवी दिल्लीः इस्रायल आणि भारताचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. आज इस्रायलचे भारतातील राजदूत यांनी भारताची माफी मागितली असून त्याचे कारणही तसेच आहे. इफ्फी चित्रपट महोत्सवात (IFFI Film Festival) समारोपाच्या कार्यक्रमात मुख्य ज्यूरी आणि इस्रायलमधील चित्रपट निर्माते नादव लॅपिड (Nadav Lapid`s Comments on The Kashmir Files) यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या चित्रपटाला असभ्य, अश्लील चित्रपट असल्याचा शिक्का मारला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सोशल मिडियावर देशभरातून संताप व्यक्त झाल्या आहेत. त्याची दखल इस्रायलच्या भारतातील राजदुतांना घ्यावी लागली आहे. त्यांच्यावर याप्रकरणी माफी मागण्याची पाळी आली आहे.
इस्रायलचे चित्रपट निर्माते नादव लॅपिड हे गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival) मुख्य परीक्षक होते. लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर टीका केली.

इफ्फीसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘द कश्मीर फाइल्स’ला महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. या चित्रपटाला असभ्य, अश्लील चित्रपट असल्याचा शिक्का मारला. त्यांच्या या विधानावर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन (Israel Ambassador Naor Gilon) यांनी नाराजी व्यक्त केली. कश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत (The Kashmir Files Movie) लॅपिड यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे आणि लॅपिड यांच्या विधानामुळे आम्हाला लाज वाटत असल्याचेही नाओर यांनी सांगितले. एक माणूस म्हणून मला या प्रकाराबद्दल लाज वाटते. भारत आणि इस्रायल या दोन देशांत घनिष्ट मैत्री आहे. यजमान देशाने उदार मनाने तुमचं स्वागत केले त्याचे तुम्ही अशा पद्धतीने पांग फेडलेत, त्याबद्दल मी भारताची माफी मागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा