जागतिक एड्स दिन

0

जागतिक एड्स दिन 2022 दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. एचआयव्ही/एड्स साथीच्या आजारात ज्या रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक एड्स दिन 2022 ची थीम “समानता” ठेवली आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यूने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 मध्ये 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो.ऑगस्ट 1983 मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या (World Health Organization), जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांच्या सहमतीनंतर 1 डिसेंबर 1988 पासून हा दिवस पाळण्यात येऊ लागला. ‘जागतिक एड्स दिन’ प्रथम जेम्स डब्लू बून आणि थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये 1988 मध्ये साजरा केला. 

का साजरा केला जातो एड्स डे? (Why is AIDS Day celebrated)

जागतिक एड्स दिन साजरा करण्यामागचा उद्देश या आजाराविषयी लोकांमध्ये जागरुकता पसरवणए हा आहे. एड्स ही आधुनिक काळातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीपर्यंत 37 दशलक्षाहून अधिक लोक एचआयव्हीचे बळी ठरले आहेत. तर भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एचआयव्ही रुग्णांची संख्या सुमारे 3 दशलक्ष आहे. ही आकडेवारी गेल्यावर्षीची आहे.

एड्स रोग म्हणजे काय?

AIDS चा फूल फॉर्म Acquired Immune Deficiency Syndrome असा आहे. हा एक संसर्गजन्य लैंगिक रोग आहे. ज्या विषाणूपासून त्याची उत्पत्ती होते त्याला ह्युमन इम्यून डेफिशियन्सी व्हायरस (HIV) म्हणतात. जीवाणूंशी लढण्यासाठी शरीराच्या स्वतःच्या नैसर्गिक शक्तीला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. परंतु एड्सचा विषाणू या पांढऱ्या रक्त पेशींना निष्क्रिय करून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो, ज्यामुळे विषाणूशी लढण्याची शरीराची शक्ती संपते. यामुळे व्यक्ती हा कमकुवत होतो.

एड्स कसा पसरतो?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, एचआयव्ही हा विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे किंवा गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान आईपासून बाळापर्यंत पसरू शकतो. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे या संसर्गाची प्रकरणे अधिक दिसतात. हे टाळण्यासाठी आरोग्य तज्ञ लोकांना कंडोम वापरण्याचा सल्ला देतात.

एड्सची लक्षणे काय?

  • पीडित व्यक्तीच्या चेहऱ्यावर पांढरे ठिपके दिसतात.
  • जास्त घाम येणे.
  • वारंवार थकवा येणे.
  • अचानक वजन कमी होणे.
  • खूप ताप, वारंवार जुलाब, सतत खोकला किंवा घसा खवखवणे.
  • मांड्या आणि काखेत सूज येणे.
  • शरीरावर खाज आणि जळजळ होते.
  • न्यूमोनिया, टीबी किंवा त्वचेचा कँसर होणे.

एड्सपासून असा करता येईल बचाव

एड्स एक जीवघेणार आजार आहे. या आजारावर अद्यापही उपचार उपलब्ध नाहीत. हा रोग होऊ नये यासाठी काळजी घेणे हाच याचा एकमेव उपाय आहे. याच उपायांविषयी जाणून घेऊया…

  • असुरक्षित सेक्स, समलैंगिक सेक्स आणि वेश्यांसोबत सेक्स टाळा. फक्त तुमच्या जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवा.
  • संभोगानंतर लघवी करुन तुमचे गुप्तांग स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.
  • ओठांवर जखम असेल, रक्त स्त्राव होत असेल तर किस करणे टाळावे. या आजाराचे विषाणू लाळेद्वारे तुमच्या रक्तात पोहोचू शकतात आणि तुम्हाला या आजाराचा त्रास होऊ शकतो.
  • सलूनमध्ये दाढी करताना नवीन ब्लेड वापरण्यास सांगा.
  • एड्सची लागण झालेल्या महिलांनी गरोदर राहू नये, कारण हा आजार त्यांच्या बाळांनाही पसरू शकतो.
  • इंजेक्शन घेताना फक्त डिस्पोजेबल सिरिंज आणि सुया वापरा.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा