नागपूरकरांसाठी पुन्हा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची मेजवानी कविता कृष्णमूर्ती, मोहित चौहान, हरिहरन, शैलेश लोढा येणार

0

नागपूर : नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा २ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार (Khasdar Cultural Festiva Nagpur), आहे. या सांस्कृतिक महोत्सवात गायिका कविता कृष्णमूर्ती, गायक मोहीत चौहान, हरिहरन यांच्यासह अभिनेते व कवी शैलेश लोढा, अभिनेते मनोज जोशी, अमित त्रिवेदी हे प्रख्यात कलाकार हजेरी लावणार असून कार्यक्रम सादर करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. प्रचंड गाजलेल्या पुष्पा चित्रपटाचा नायक, स्टार अल्लू अर्जुनही या महोत्सवाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. गडकरी यांनी अल्लू अर्जून याला खास निमंत्रण दिले आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता उद्‍घाटन होईल.
उद्‍घाटन समारंभात एक हजार नागपूरकर कलावंतांचा सहभाग असलेला ‘वंदे मातरम’ कार्यक्रम होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला गायक संगीतकार हरिहरन यांचा लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. अमित त्रिवेदी, कविता कृष्णमूर्ती, मोहित चव्हाण या गायकांचे लाईव्ह कार्यक्रम होतील. कवी शैलेश लोढा यांच्या हास्यव्यंग कवितांचा कार्यक्रम, ‘चाणक्य’ महानाट्य, ‘तथागत’ हे भगवान बुद्धांवरील महानाट्य, ‘पुण्यश्लोक अहिल्या’ हे महानाट्यही सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमापूर्वी स्थानिक कलावंताना दररोज अर्धा तास कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. यात पाच हजार महिलांचा भव्य गीतापठण कार्यक्रम, बालकलावंतांचा कार्यक्रम तसेच तृतीयपंथींनाही कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
असे होणार कार्यक्रमः

  • २ डिसेंबर : उद्‍घाटन, ‘वंदेमातरम्’ स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम
  • ३ डिसेंबर : पद्मश्री गायक हरिहरन ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
  • ४ डिसेंबर : अमित त्रिवेदी ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
  • ५ डिसेंबर : अभिनेते मनोज जोशी यांचा ‘चाणक्य’ हा नाट्यप्रयोग
  • ६ डिसेंबर : ‘तथागत’, भगवान बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर आधारित महानाट्य
  • ७ डिसेंबर : ‘पुण्यश्लोक अहिल्या’ महानाट्य
  • ८ डिसेंबर : मनोज मुंतशिर यांचा ‘मॉ, माटी और मोहब्बत’ हा कार्यक्रम.
    -९ डिसेंबर : अभिनेते व कवी शैलेश लोढा यांचा हास्यव्यंग कवितांचा कार्यक्रम
  • १० डिसेंबर : सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
  • ११ डिसेंबर : गायक मोहित चौहाण ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ व समारोप

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा