भारतीय संघाला धक्का, मोहम्मद शामीही जायबंदी, उमरान मलीकचा समावेश

0

ढाका: भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्या रविवारपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार (India Tour Of Bangladesh) असून या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर झालाय. मोहम्मद शामी एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, त्याला एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागल्याने आता भारताच्या चिंता वाढल्या आहेत. त्याच्या जागी भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा (Umran Malik) संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने यासंदर्बात घोषणा (BCCI) केलीय. ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान मोहम्मद शामीला दुखापत झाल्याची माहिती पुढे आली आहे.
सराव सत्रादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. तो सध्या एनसीए बेंगळुरू येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. निवड समितीने शमीच्या जागी उमरान मलिकची निवड केली आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ असेः
बांगलादेश एकदिवसीय संघ:
तमिम (कर्णधार), लिओन, इनामूल, शाकिब, मुशफिकुर, अफिफा, यासिर अली, मेहिदी, मुस्तफिझूर, तस्किन, हसन महमूद, इबादत, नसुम, महमुदुल्ला, शांतो आणि नुरुल हसन.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा