चॉकलेट्स खाताच 18 शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा

0

नागपूरमध्ये खळबळ : लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू


नागपूर. चॉकलेट्स खाल्ल्यामुळे नागपूरच्या सीताबर्डीतील एका शाळेतील तब्बल 18 विद्यार्थ्यांना विषबाधा (18 students poisoned by eating chocolate) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी मदन गोपाळ अग्रवाल हायस्कूलचे (Madan Gopal Aggarwal High School ) असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांवर सध्या लता मंगेशकर रुग्णलयात (Lata Mangeshkar hospital) उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी तिघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनोळखी व्यक्तीने चॉकलेट वाटले. विद्यार्थ्यांनी आनंदाच्या बरात चॉकलेट खाल्ले आणि काही वेळातच त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याचे सांगितले जाते. एकाचवेळी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत असल्याने शिक्षकही घाबरून गेले. ताताडीने सर्वच विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक काळ्या रंगाची कार शाळेबाहेर येऊन थांबली. या कारमधून तोंडावर मंकी कॅप घातलेली एक व्यक्ती उतरली. या व्यक्तीने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटली आणि संबंधित व्यक्ती तिथून निघून गेला. ही चॉकलेट्स मुलांनी खाल्ली. एक-दोन चॉकलेट्स खाल्लेल्या मुलांना फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अनोळखी व्यक्तीकडून चार ते पाच चॉकलेट्स घेऊन खाल्लेल्या मुलांना त्रास जाणवायला लागला. ही बाब शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर १८ मुलांना नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात तातडीने दाखल केले. येथील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले. तेव्हा या शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सर्व मुलांची प्रकृती उपचारानंतर स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी लता मंगेशकर रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे सध्या रुग्णालयातील बालरुग्ण विभागाबाहेर पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेतबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांना चॉकलेटस वाटणारी व्यक्ती नेमकी कोण होती, या