24 बाय 7 काम करणार , समस्या सोडविण्यास प्राधान्य। -आ मोहन मते यांची ग्वाही

0

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासचे विशवस्त म्हणून नियुक्ती झालेले दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी शानदार कार्यक्रमात सूत्रे स्वीकारली. यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. प्रथमच याप्रकारचे पद्ग्रहण झाले हे विशेष. यावरून जनतेच्या मनात आमदार मोहन मते यांच्याविषयी असलेले प्रेम दिसून आले. या पदग्रहण सोहळयाला भा.ज.प. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहर अध्यक्ष प्रविण दटके,आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, आमदार ना.गो. गाणार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना प्रवीण दटके यांनी जनसामान्यातील नेता म्हणजे मोहन मते असे सांगुन ते नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत नागपूरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास तत्पर असतील व ते त्या समस्या नक्कीच सोडवतील असा विश्वास व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील मोहन मते हे जनसामान्यात वास्तव्य करणारे नेता आहेत त्यामुळे कार्यकर्ता व मोहन मते यांचे एक वेगळे नाते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची विश्वस्त म्हणुन नेमणुक करुन जो विश्वास दाखविला त्या विश्वासाचे नक्कीच सार्थक करतील असे मत व्यक्त केले. आ मोहन मते यांनी झोपडपट्टीवासीयांचे पट्टेवाटप मार्गी लागेल, 24 बाय 7 मी जनतेसाठी काम करेल असा विश्वास बोलून दाखविला.