नवीन कार्यकर्त्यांकडे दिली जाणार जबाबदारी
नागपूर. राष्ट्रीय समाज पक्षाच्या (RSP) पदाधिकाऱ्यांची आणि रासपमध्ये नव्याने प्रवेश घेऊन सक्रिय राजकारणात सहभागी होवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्याची विदर्भ स्तरीय (Vidharbha level), जिल्हास्तरीय आणि शहरातील कार्यकर्त्याची आढावा बैठक तसेच नवीन कार्यकर्त्याची पदनियुक्ती कार्यक्रम रासपच्या विदर्भस्तरीय जनसपंर्क कार्यालय, म्हाळगी नगर चौक, एचपी पेट्रोल पंप समोर रिंगरोड नागपूर येथे रविवार १३ नोव्हेंबरला होणार आहे. विदर्भ अध्यक्ष तथा रामटेक लोकसभा प्रभारी प्रा. रमेश पिसे (Ramesh Pise), विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार (Sanjay Kannavar) यांनी बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीत विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत राष्ट्रीय समाज पक्षाची रणनीती पक्षश्रेठींच्या आदेशानुसार स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय ठरवण्यरत येणार आहे. तसेच विदर्भातील जिल्हा आणि शहरातील कार्यकर्तांचा आढावा घेऊन राष्ट्रीय समाज पक्षात नव्यने प्रवेश घेऊन सक्रिय राजकारणात सहभागी होवू इच्छिणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांचा, विदर्भ कार्यकारणीत, जिल्हा कार्यकारणीत आणि शहर कार्यकारणीत पदनियुक्ती करून पक्ष बांधणी मजबूत करण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा, शहर संपर्क प्रमुख, सोशल मिडिया संप्रर्क प्रमुख, विधी आघाडी प्रमुख, महिला आघाडी, युवक आघाडी, विध्यर्थी आघाडी, कामगार आघाडी, शेतकरी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, अनु -जाती -जमाती आघाडी, व्यापारी आघाडी, वाहतूक आघाडी, आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीला प्रामुख्याने विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ अध्यक्ष तथा रामटेक लोकसभा प्रभारी प्रा. ऍड. रमेश पिसे,विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार. विदर्भ संघटक हरिकिशन (दादा )हटवार,विदर्भ विधी आघाडी अध्यक्ष ऍड. वसुदेव वासे, सचिव रामदास माहुरे कोषाध्यक्षपुरुषोत्तम कामडी, ,विदर्भ सोशल मिडिया प्रमुख प्रा. सुधीर सुर्वे, नागपूर लोकसभा प्रभारी तथा शहर अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर,नागपूर शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ. संध्या शेट्टे, वर्धा महिला संघटक वृंदा गुजर, मोना दहे, अमरावती जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रमोद पाथुर्डे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश भोंगडे, वाशीम जिल्हा अध्यक्ष दिपक तिरके, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमोल काकड, संपर्क प्रमुख अतुल भुसारी -पाटील, नागपूर शहर मुख्य सचिव डॉ. प्रशांत शिंगाडे, उपाध्यक्ष डॉ. अरुण चुरड, सचिव देविदास आगरकर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वघरे, नागपूर पूर्व विधानसभा संघटक डॉ. दादाराव इनगळें,नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम,सचिव प्रमोद मडावी, वाडी शहराध्यक्ष संजय मेश्राम,वाडी शहर प्रभारी ताराचंद मेंढे, स्वरूप रामटेके, डॉ. किशोर सुरडकर, सागर समुद्रावर, प्रा. बलदेव आडे, मंगेश सपाटे,निलेश चांडक, संजय आगारकर, धर्मेंद्र टेकाडे, बाबा टेकाडे,बाबाराव भोंगाडे, लक्ष्मण रोकडे,उल्हास बागडे, प्रशांत निंबूरकर, मनोज वाडेकर,नाना पांडे, शेषेराव रंगारी, विलास कडबे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या आढावा बैठकीस सर्व कार्यकर्ते व सदस्यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार यांनी केले आहे.