सामुहिक बलात्कार प्रकरणी नववी, दहावीतील पाच अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

0

हैदराबाद : हैदराबाद येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराच्या (Hyderabad Rape Case) प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या घटनेत पाच अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैद्राबादच्या हयातनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती. मात्र, ती उशिरा उघडकीस आली व त्यात इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या मुलांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाच जणांपैकी तिघे जण 15 तर इतर दोघे १४ वर्षांचे आहेत. पीडीत मुलगी १७ वर्षांची असून ती दहावीची विद्यार्थीनी आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुले ही रोजंदारी मजुरांची मुले आहेत. या मुलांना पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय होती. शाळा सुटल्यानंतर अनेकदा ते त्यांच्या मोबाईलवर असे व्हिडिओ पाहायचे. पीडित मुलगी त्यांच्या ओळखीची होती. तिच्यावर ऑगस्ट महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीत दोनदा अत्याचार झाले. धक्कादायक गोष्ट म्हणजे या दोन्ही प्रसंगांचे मुलांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे आढळून आले. मुलांनी मैत्रीचा गैरफायदा घेत घरी कोणी नसताना मुलीचे लैंगिक शोषण केले. यानंतर मुलांनी तिला सातत्याने ब्लॅकमेल करून तिचे पुन्हा लैंगिक शोषण केले. दरम्यान, या मुलांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ शेअर केल्यावर या घटनेला वाचा फुटली. पीडीतेच्या कुटुंबीयांना या व्हिडिओची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बालसुधारगृहात पाठवले आहे.

Shankhnaad News | epesoid 44 रवा खवा करंजी आणि भरली वांगी