सावरकर मुद्यावर शिवसेनेच्या मुखपत्राची चक्क राहुल गांधींवर टीका

0

मुंबई : सावरकरांची बदनामी करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर शिवसेनेने टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विचारांशी सहमत नसल्याची मिळमिळत प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या शिवसेनेने काल महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा सूचक इशारा काल काँग्रेसला दिला होता. आता शिवसेनेच्या मुखपत्रात राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली ( Vir Savarkar Controversy) आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशात पसरत चाललेल्या तिरस्कार व द्वेषाच्या राजकारणाविरोधात आहे. पण वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार आधी नष्ट व्हायला हवा. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील, (Shiv Sena Thackeray Group on Rahul Gandhi ) असे शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे मागितलेल्या माफीच्या मुद्यावरून राजकारण तापले असताना शिवसेनेने राहुल गांधी यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने भाजप-शिंदे गटावरही निशाणा साधला आहे.

सावरकर माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्याने काँग्रेस नेत्यांची अवस्था अवघडल्यासारखी झाली असेल, अशी टीका राहुल गांधींवर करण्यात आली. राहुल गांधी विरोधकांना ही संधी का देतात, हा संशोधनाचा विषय असल्याचे मुखपत्रातील अग्रलेखात नमूद करण्यात आले. सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी होते असे सांगताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने सावरकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. नाशिकच्या जॅक्सन वधाच्या खटल्यातील ते मुख्य आरोपीच होते. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तयार करण्याचे काम सावरकरांनी केले. ब्रिटिशांना सावरकरांचे भय वाटत होते म्हणूनच त्यांना तब्बल पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानात धाडण्यात आले. इतकी भयंकर शिक्षा ठोठावलेले या भारतमातेचे ते एकमेव सुपुत्र होते. अंदमानात सावरकरांनी 10 वर्षांची यातनामय शिक्षा भोगली. या काळात त्यांनी पाचेक वेळा ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली व त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही, असेही ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे

फिश आणि चिप्स, टमाटर सॉस आणि बरितो| Fish,Chips,Tomato Sauce & Burrito Recipe |Epi 36|Shankhnaad News

https://www.youtube.com/watch?v=F5ze5Xhxo7o
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा